नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक(complaint) खरात याच्याविरोधात एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्याचे एकापाठोपाठ एक काळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 100 व्हिडीओ सापडले आहेत. दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या जादूटोण्याचा संबंध अशोक खरात याच्याशी जोडला जात आहे.

अजितदादा यांच्या घरासमोर कथाकथीत (complaint)जादूटोणा केला गेला होता, यामागे नाशिक प्रकरणातील आरोपी अशोक खरात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा आणि काळी जादू त्यांच्याच लोकांनी केली असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला आहे. दरम्यान दुसरीकडे रुपाली पाटील यांनी देखील या प्रकरणाशी खरातचं कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट? CMO कार्यालयाकडून मोठ्या हालचाली, सूत्रांची माहिती काय?

खात्रीने सांगता येईल की,(complaint) या संदर्भात दादांच्यावर काहीतरी कथाकथीत संमोहन मोहिनी, काळी जादू असं काहीतरी हा माणूस अशोक खरात करायचा. या बोगस माणसाने राजकीय नेते आपल्या हाताशी धरून या सर्व गोष्टी केल्या. दादांवर मोहिणी टाकून आपल्याला सत्ता पाहिजे, अशा स्वरुपाच्या काही गोष्टी करणारे लोक होते. दादांना प्रभावीत करण्यासाठी अशा काही गोष्टी करण्यात आल्या अशी आमची माहिती आहे.

दरम्यान अजितदादांच्या घराबाहेर जो उतारा पहायला मिळाला होता, तो कॅप्टन खरातनेच केला आहे का? असा प्रश्नही यावेळी माने यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, आम्हाला जी काही माहिती मिळते त्यावरून तो माणूस यामध्ये सहभागी आहे, असं आमच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी असं माने यांनी म्हटलं आहे.

नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी त्याने प्लॉटस खरेदी केली आहे. त्याच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची एकूण किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. अशोक खरातसह त्याची बायको, मुलगी, नातेवाईकांच्या नावावर देखील संपत्ती असल्याचे समोर आलं आहे, त्यामुळे आता या सर्व मालमत्ताची तपासणी होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *