महाराष्ट्रात सध्या अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. स्वतःला भविष्यवेत्ता म्हणून सादर करणाऱ्या खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप समोर आले असून या प्रकरणाने मोठे वादळ निर्माण केले आहे. (political) सोशल मीडियावर काही कथित व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिकच गाजले, तर फेब्रुवारीमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली.

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विविध कार्यक्रमांमध्ये त्या खरातसोबत दिसल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. अखेर वाढत्या दबावानंतर त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने महिला आयोगाचे अध्यक्षपद सध्या रिक्त झाले आहे. (political) दरम्यान, आता या महत्त्वाच्या पदावर कोणाची नियुक्ती होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः हे पद पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडेच राहणार का, याकडे लक्ष लागले होते. प्राथमिक माहितीनुसार, हे पद राष्ट्रवादीकडेच कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्या अध्यक्षपदासाठी दोन महिला नेत्यांची नावे चर्चेत आहेत. पुण्यातील वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रतिशा शिंदे यांच्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू असल्याचे समजते. पक्षांतर्गत स्तरावर या दोन्ही नावांवर चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या नेतृत्वाबाबतचा निर्णय महत्त्वाचा मानला जात असल्याने सर्वांचे लक्ष या घडामोडींवर केंद्रीत झाले आहे. (political) आगामी काळात कोणाला ही जबाबदारी दिली जाते, यावर राज्यातील महिला सुरक्षेच्या धोरणांवरही परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज