डोंबिवली परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

डोंबिवलीजवळील धामटण गाव परिसरात उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध टाकल्यामुळे सात भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (animal lovers) या घटनेप्रकरणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकलव्य अॅनिमल्स पेडिग्री कंपनीचे मालक वीरेंद्र कुमार निषाद, त्यांचा भाऊ आणि काही कामगार यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा किशोर सुर्वे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून परिसरातील भटक्या कुत्र्यांची देखभाल करत असून त्यांना अन्नही देत होत्या. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपींकडून 12 मार्च 2026 पासून परिसरात उंदीर मारण्याची विषारी पावडर टाकण्यात येत होती. हीच पावडर खाल्ल्यामुळे सुरुवातीला चार आणि त्यानंतर आणखी तीन अशा एकूण सात कुत्र्यांचा मृत्यू झाला.तक्रारीत आणखी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. (animal lovers) याआधीही अशाच प्रकारे तब्बल 36 भटकी आणि पाळीव कुत्री मारल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी “भटक्या कुत्र्यांना मारणारच” अशी उघड धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले असून, तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृत कुत्र्यांचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान,हद्दीत सुमारे 90 हजार भटकी कुत्री असल्याची नोंद आहे. (animal lovers) काही दिवसांपूर्वीच या मुद्द्यावर चर्चा झाली होती. मात्र या घटनेमुळे प्राणी संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज