वनडे वर्ल्डकप स्पर्धा दर चार वर्षांनी होत असते. 2023 साली भारतात वनडे स्पर्धा झाली होती. आता पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 साली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्याकडे असणार आहे. या स्पर्धेसाठी नवा फॉर्मेट असणार आहे. (World Cup) त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी नियम काय असणार आहेत? चला जाणून घेऊयात सविस्तर.. मागच्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 10 संघांनी भाग घेतला होता आणि राउंड रॉबिन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली होती. पण पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत एकूण 14 संघ भाग घेणार आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमान तीन देशांकडे आहे. त्यापैकी दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांना थेट एन्ट्री मिळणार आहे. तर नामिबियाला पात्रता फेरीतून जावं लागेल. जर पात्र ठरली तर स्पर्धेचं तिकीट मिळेल. स्पर्धेतील आठ संघांची निवड आयसीसी क्रमवारीच्या आधारावर होणार आहे. हे आठ संघ 31 मार्च 2027 पर्यंत आयसीसी क्रमवारीत टॉप 8 मधील असतील ते संघ निवडले जातील. तर उर्वरित चार संघ हे दहा संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या पात्रता फेरीच्या माध्यमातून निवडले जातील.
पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुपर सिक्स फॉर्मेट असेल. 14 संघांना स्पर्धेत सहभागी केलं जाईल. त्यानंतर ए आणि बी असे दोन 7 संघांचे गट केले जातील. प्रत्येक गटात प्रत्येक संघ रॉबिन राउंड पद्धतीने सहा सामने खेळेल.(World Cup) यातील टॉप 3 संघ सुपर 6 मध्ये जागा मिळवतील. सुपर सिक्समधील टॉप चार संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळेल. सुपर 6 मधील पहिल्या स्थानावरील संघाचा चौथ्या स्थानावरील संघाशी उपांत्य फेरीत लढत होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ एकमेकांशी लढतील.
सामना बरोबरीत सुटला तर निकाल सुपर ओव्हरमध्ये लागेल. मग त्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर होतील. 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्या. त्यामुळे इंग्लंडला चौकारांच्या आधारावर विजयी घोषित केलं. त्यामुळे वाद झाला होता.वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ‘सॉफ्ट सिग्नल’ नियम लागू असेल. मैदानातील पंच तिसऱ्या पंचांचा सल्ला न घेता किचकट प्रश्नी प्रथम निकाल देतात. त्यानंतर तिसरा पंच ते विविध अँगलने पाहतो. ठोस पुरावे मिळाले तर निकाल बदलेल.पण त्यांनाही कधी कधी ठोस पुरावा सापडत नाही. (World Cup) अशा स्थितीत मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
मैदानातील सीमा किमान 70 मीटर लांब असणे आवश्यक आहे. हा नियम 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत लागू करण्यात आला होता. आताही हा नियम असेल.
हेही वाचा :
6 पट पैसे मोजले तरी स्टार बॉलर खेळणार नाही, कारण काय?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! अदिती तटकरेंनी दिली गुड न्यूज