गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत, त्यामुळे भाजपमधील अलिखित नियमाप्रमाणे ते निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच एका शेतकऱ्याने नरेंद्र मोदींना निवृत्त करण्याची मागणी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान कऱण्याची मागणी केली आहे. किशोर तिवारी असे या शेतकऱ्याचे नाव असून तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.

पंतप्रधान(Prime Minister) नरेंद्र मोदी यांचे वय ७५ वर्षे पूर्ण होत आल्याने त्यांना आता विश्रांती द्यावी आणि २०१४ मध्ये पंतप्रधानपदाची संधी नाकारलेले ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना देशाच्या नेतृत्वाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. यासंदर्भात तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक खुले पत्र लिहिले आहे.
या पत्रात तिवारी यांनी सांगितले की, “मी यवतमाळ जिल्ह्यात मागील ४० वर्षांपासून आदिवासी व वंचित शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. माझे वडील पं. जमुनाशंकर तिवारी हे १९६२ पासून संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते. मला भाजप सरकारच्या काळात शेतकरी स्वावलंबन उच्चाधिकार मिशनचे अध्यक्षपद व राज्यमंत्री दर्जा मिळाला होता. मी स्वतः संघटन शिबिर प्रशिक्षित स्वयंसेवक आहे, म्हणूनच हे पत्र लिहित आहे.”
तिवारी यांनी पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील कामगिरीचे कौतुक करताना लिहिले आहे की, “मोदी यांनी राममंदिरासारखी अनेक चांगली कामं केली आहेत. मात्र, २०१२ मध्ये काही नेत्यांनी नितीन गडकरी यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत कट रचला आणि त्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची संधी हिरावण्यात आली.”
या कटात लालकृष्ण अडवाणी आणि प्रकाश जावडेकर यांचा सहभाग असल्याचा दावा करत तिवारी म्हणाले, “ते दोघेही आज जिवंत आहेत आणि योग्य वेळी सत्य समोर आणून गडकरी यांची माफी मागतील, अशी अपेक्षा आहे. नितीन गडकरी यांची ओळख एक कार्यक्षम, सर्वांना सोबत घेऊन जाणारे मंत्री म्हणून आहे.
हेही वाचा :
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी
मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
मृत्यूनंतरही यातना, अंत्यविधीसाठी जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून नेण्याची वेळ Video