आयुष्य हे संघर्षांनी भरलेलं आहे. आपल्याला आयु्ष्यात अनेकदा कठीण प्रसंगांमधून जावं लागतं. अनेक संकटांमधून जावं लागतं. या संकटांना समोरं जात, त्यावर मात करत आपल्याला आपली वाटचाल करायची असते. आयुष्याची ही वाट सोपी नसते. फार कठीण काळातून जावं लागतं. अनेकदा आयुष्य जगत असताना मरण(death) यातना सोसाव्या लागतात. पण आपण ध्येयाने सगळ्या गोष्टींना सामोरं जात असतो. पण अनेकांचा आयुष्याचा संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत संपत नाही नांदेच्या मुखेडमध्ये तर मरणानंतरही यातना सोसाव्या लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एकीकडे पावसाने हाहा:कार माजवला आहे, तर दुसरीकडे पूराच्या पाण्याने सर्व रस्ते बंद झाले आहेत. मुसळधार पावसासाठी अंत्यविधीसाठी(death) कुटुंबीय आणि ग्रामस्थांना अक्षरशः जीव धोक्यात घालून मृतदेह नदीच्या पाण्यातून वाहून नेण्याची वेळ आली. ही घटना तारदडवाडी येथे घडली आहे. विशेष म्हणजे या गावात स्मशानभूमी नसून ग्रामस्थांना आपल्या शेतात किंवा खासगीत अंत्यस्कार करावे लागतात.
तारदडवाडी येथील डॉ. नारायण दिगांबर पाटील यांचे मुंबईत निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी सकाळी तरदडवाडीत येथे आणण्यात आले होते. मात्र गावात सार्वजनिक स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना नाल्याचे पात्र ओलांडून खाजगी शेतात अंत्यविधी करावा लागला. यावेळी लेंडी नदीला पूर आल्याने रस्ते बंद झाले होते. अशा कठीण परिस्थितीत ग्रामस्थांनी धैर्य एकवटत मृतदेह खांद्यावर घेतला आणि खोल पाण्यातून मार्ग काढत शेतात अंत्यविधी केला.
या प्रसंगी निसर्गाच्या लाटांशी झुंज देत त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. जड अंत:करणाने, डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आणि आकाशातून पडणारा पाऊस यामध्ये कोणताही फरक उरला नव्हता. जणू दु:ख आणि निसर्गाचा अविष्कार एकरूप झाला होता. ही घटना प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दुर्दैवाने अजूनही गावात अंत्यविधीसाठी सुरक्षित रस्ता किंवा पूल उपलब्ध नाही. त्यामुळे अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने पायाभूत सुविधा उभारण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… Video Viral
क्रीडा क्षेत्राला हादरवणारी बातमी! भारतीय खेळाडूची 120 गोल्ड मेडल्स चोरीला
Swiggy ची मोठी घोषणा! आता इलेक्ट्रिक स्कूटरने होणार डिलिव्हरी