1 एप्रिलपासून पॅन कार्डच्या नियमात (change)मोठा बदल होणार असून याचा थेट परिणाम नवीन पॅन कार्ड बनवणाऱ्यांवर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे.नवीन नियमांनुसार आता फक्त आधार कार्डच्या मदतीने पॅन कार्ड बनवता येणार नाही, तर जन्मतारीख सिद्ध करणारा अतिरिक्त पुरावा देणे अनिवार्य होणार आहे. सरकारने हा बदल १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून सध्या ३१ मार्चपर्यंतच आधारवर आधारित सोपी प्रक्रिया उपलब्ध आहे.

नवीन नियमांमध्ये पॅन अर्ज (change)करताना जन्म प्रमाणपत्र, दहावीची मार्कशीट, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे आवश्यक ठरणार आहेत, त्यामुळे प्रक्रिया अधिक कडक होणार आहे. तसेच नाव आणि इतर तपशील आधारशी अचूक जुळणेही आवश्यक करण्यात आले आहे, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
यासोबतच सरकार नवीन (change)आयकर नियमांद्वारे मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन कार्ड अनिवार्य करण्याच्या दिशेनेही पावले उचलत आहे, ज्यामुळे आर्थिक व्यवहारांवर अधिक नियंत्रण आणि पारदर्शकता वाढणार आहेएकंदरीत, १ एप्रिलपासून पॅन कार्डसंबंधित नियम अधिक कडक होत असून नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे ठरणार आहे.