गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी(Gold) घसरण झाल्याची माहिती समोर आली असून ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे.गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. बाजारातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे दर अचानक खाली आले असून काही ठिकाणी १० ग्रॅममागे हजारो रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

आजच्या ताज्या दरांनुसार, २४ कॅरेट (Gold )सोन्याचा दर सुमारे ₹1,36,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे, तर २२ कॅरेट सोनं सुमारे ₹1,25,000 च्या आसपास ट्रेड होत आहे. याचा अर्थ प्रति तोळा (सुमारे 11.66 ग्रॅम) दरही लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच्या उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल ₹8,000 ते ₹10,000 पर्यंत घसरण झाल्याचेही दिसून येत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही खरेदीची संधी मिळत आहे.
तज्ञांच्या मते, डॉलर मजबूत होणे, (Gold)आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव आणि गुंतवणूकदारांनी नफा बुकिंग केल्यामुळे ही घसरण झाली आहे. मात्र, ही घसरण तात्पुरती असू शकते आणि पुढील काळात पुन्हा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकंदरीत, लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सध्या योग्य वेळ मानली जात आहे.