RuPay कार्ड वापरणाऱ्यांसाठी (users)महत्त्वाची बातमी समोर आली असून १ एप्रिलपासून काही मोठे नियम बदलणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम लाखो कार्डधारकांवर होणार असल्याने ग्राहकांनी आधीच सावध राहणे गरजेचे झाले आहे.सर्वात मोठा बदल म्हणजे National Payments Corporation of India ने RuPay कार्डवरील सुविधा पुन्हा संरचित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ एप्रिल २०२६ पासून (users)अनेक RuPay डेबिट कार्ड्सवरील मोफत लाउंज अॅक्सेस सुविधा बंद किंवा मर्यादित केली जाणार आहे. विशेषतः RuPay प्लॅटिनम डेबिट कार्डधारकांना आतापर्यंत मिळणारी फ्री एअरपोर्ट आणि रेल्वे लाउंज सेवा बंद होऊ शकते किंवा ती खर्चाच्या अटींवर दिली जाईल. याशिवाय, कार्डवरील कॅशबॅक आणि इतर रिवॉर्ड्समध्येही बदल होण्याची शक्यता आहे. काही बँका आधीच लाभ कमी करत असून ग्राहकांना पूर्वीसारखे फायदे मिळणार नाहीत. दरम्यान, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी १ एप्रिलपासून दोन-स्तरीय प्रमाणीकरण देखील अनिवार्य केले जाणार आहे.
यामुळे प्रत्येक व्यवहार अधिक (users)सुरक्षित होईल, पण काही वेळा अतिरिक्त प्रक्रिया करावी लागेल. एकंदरीत, RuPay कार्ड वापरणाऱ्यांसाठी ही “धोक्याची घंटा” मानली जात असून, पूर्वी मिळणारे फायदे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपले कार्ड फायदे, अटी आणि बँकेचे अपडेट्स वेळोवेळी तपासणे अत्यावश्यक झाले आहे.