१ एप्रिलपासून देशात आयकर व्यवस्थेत (gift)मोठे बदल लागू होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. केंद्र सरकारने नवीन आयकर नियम 2026 लागू करताना सिस्टीम अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यावर भर दिला आहे.

त्यामुळे HRA पासून गिफ्टपर्यंत (gift)अनेक बाबींमध्ये बदल दिसणार आहेत.नवीन नियमांनुसार HRA क्लेम करण्यासाठी आता अधिक कडक पडताळणी होणार आहे. घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती डिजिटल पद्धतीने तपासली जाणार असून बनावट दावे थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
तसेच, नोकरीत मिळणाऱ्या (gift)गिफ्ट्स आणि वाउचर्सबाबतही नियम बदलले आहेत. नियोक्त्याकडून मिळणाऱ्या गिफ्ट्सना ठराविक मर्यादेपर्यंतच करमुक्ती मिळणार असून त्यापेक्षा जास्त रक्कम करपात्र ठरणार आहे. शेअर बाजाराशी संबंधित व्यवहारांवरही अधिक कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवण्यात आला असून गुंतवणूकदारांना आता अधिक कर द्यावा लागू शकतो.
याशिवाय ITR भरण्याच्या तारखांमध्ये बदल, (gift)सुधारित रिटर्न दाखल करण्यासाठी अधिक वेळ, तसेच काही उत्पन्न स्रोतांवरील वजावटीत बदल असे अनेक निर्णय घेतले गेले आहेत. सरकारने हे बदल करचुकवेगिरी रोखण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि कर प्रणाली सोपी करण्यासाठी केले असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या नव्या नियमांमुळे अनेक करदात्यांचे टॅक्स प्लॅनिंग बदलणार असून काहींचा कर वाढण्याची शक्यता आहे.