मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जगाचे लक्ष इराण आणि त्याच्या (military situation) युद्धस्थितीकडे लागलेले असतानाच, युरोपात आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. युक्रेनने रशियाच्या बाल्टिक किनाऱ्यावर असलेल्या सर्वात मोठ्या तेल निर्यात टर्मिनलवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामुळे प्रिमोर्स्क येथे मोठी आग लागली असून इंधन टाक्यांमधून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रशियाच्या संरक्षण (military situation) मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात आले. एकूण २४९ ड्रोन डागण्यात आले होते, त्यापैकी अनेक ड्रोन लेनिनग्राड परिसरात नष्ट करण्यात आले. मात्र काही ड्रोन बाल्टिक समुद्राजवळील महत्त्वाच्या तेल लोडिंग टर्मिनलवर कोसळले आणि त्यामुळे प्रिमोर्स्क येथे आग लागल्याचे सांगितले जात आहे. हा टर्मिनल रशियाच्या बाल्टिक पाइपलाइन सिस्टीमचा शेवटचा टप्पा असून येथे दररोज सुमारे १५ लाख बॅरल कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची हाताळणी केली जाते.

या हल्ल्यानंतर प्रिमोर्स्कसह जवळील उस्त-लुगा बंदरही तात्पुरते बंद करण्यात (military situation) आले आहे. तज्ज्ञांच्या मते, या बंदरांमधून युराल्स क्रूडचा मोठा हिस्सा निर्यात केला जातो आणि त्याचा काही भाग भारतातही पोहोचतो. त्यामुळे या हल्ल्याचा थेट परिणाम भारताच्या तेल पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.साधारणपणे रशियातून निघणारे तेल जहाजांद्वारे युरोप किंवा मेडिटेरेनियन मार्गे सुएझ कालवा ओलांडत लाल समुद्र आणि पुढे अरबी समुद्रातून भारतात पोहोचते. या संपूर्ण प्रवासासाठी ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत हा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची भीती आहे.

दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी (military situation) आधीच बंद झाल्यामुळे जागतिक तेल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गातून दररोज सुमारे २ कोटी बॅरल तेलाची वाहतूक होत असते. आता बाल्टिक समुद्रातील पुरवठाही खंडित झाल्याने जागतिक ऊर्जा संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या सर्व घटनांमुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असून तेलाच्या किंमतींवर आणि पुरवठ्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषतः भारतासारख्या आयात-आधारित देशांसाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

हेही वाचा :

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! गव्हावरील किमान आधारभूत किंमत वाढवली

मोठं संकट ओढावणार ! पेट्रोल-डिझेलचे दर ५० ते ६० रूपयांनी महागणार ?

हार्दिक कॅप्टन्सी सोडणार अन् सूर्याकडे MI ची धुरा ?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *