राज्यात उन्हाळ्याची तीव्रता (mercury) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी गाठल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. अनेक भागांत दुपारच्या वेळी अक्षरशः सूर्य आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते ओस पडताना दिसत आहेत.

हवामान खात्याने पुढील (mercury)काही दिवसांसाठी उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे.विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

पुरेसे पाणी पिणे, हलके(mercury) आणि सैल कपडे परिधान करणे, तसेच थेट उन्हात जाणे टाळणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जात आहे.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे वीजेची मागणीही वाढली असून काही ठिकाणी पाण्याचा तुटवडाही जाणवत आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *