नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून या प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली १८ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या अशोक खरातविरुद्ध तक्रारींचा आकडा वाढतच असून, आता आणखी महिलांनी पुढे येत गंभीर आरोप केले आहेत. विधी आणि धार्मिक उपचारांच्या नावाखाली महिलांचा छळ केल्याचे या फिर्यादींमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी रचलेली गोपनीय रणनीतीही समोर आली आहे. खरात परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर Shirdi पोलिसांनी त्याच्यावर गुप्तपणे नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. अटकेच्या आठ ते दहा दिवस आधीपासूनच त्याच्या बंगल्याबाहेर साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले होते आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते.

तपासात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला तो त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव. (Nashik) त्याने खरातच्या गैरकृत्यांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली. ही बाब लक्षात येताच खरातने नीरजवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचाही कट रचला. मात्र या प्रकरणामुळेच पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिस जेव्हा नीरजच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याच्या आईने व्यक्त केलेली भीती परिस्थितीची गंभीरता दाखवणारी होती. त्यानंतर पोलिसांनी नीरजला सुरक्षित ठिकाणी हलवून त्याच्याकडील पुरावे ताब्यात घेतले.

७ ते १४ मार्च दरम्यान पोलिसांनी दोन शिफ्टमध्ये २४ तास खरातवर नजर ठेवली. त्याच्या भेटीगाठी, वाहनांची ये-जा, हालचाली यांची सविस्तर माहिती गोळा करण्यात आली. (Nashik) तसेच त्याचा पाठलाग करण्यासाठी विशेष वाहनांचाही वापर करण्यात आला. तपासादरम्यान तो देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ९ मार्च रोजी त्याला गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आणि १० मार्च रोजी त्याच्याविरुद्ध लुक-आऊट नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे त्याचा परदेशात जाण्याचा डाव पूर्णपणे फसला.

या संपूर्ण कारवाईदरम्यान शिर्डी पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळत स्वतंत्रपणे ऑपरेशन राबवले. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. (Nashik) महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सध्या पुढील तपास करत असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

दिवसभर थकवा का जाणवतोय? जाणून घ्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी?

पुन्हा युद्ध पेटणार? इराणने ऐकलं नाही तर… डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात नेमकं काय?

महिलांनो घाबरू नका, पुढे या; भोंदूबाबा अशोक खरातची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *