राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या योजनेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता फेब्रुवारी 2026 चा हप्ता लवकरच वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून तब्बल 277 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे . (Majhi Ladki Bahin) यापूर्वी जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारीचा हप्ता देखील वेळेत मिळणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे.

योजनेच्या पात्रतेनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांनी चुकीची माहिती भरल्याचे समोर आले आहे. (Majhi Ladki Bahin) त्यामुळे अशा महिलांना माहिती दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता या अंतिम मुदतीस फारच कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही किंवा त्यात दुरुस्ती केलेली नाही, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. (Majhi Ladki Bahin) त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी तातडीने मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यामुळे अनेक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली गेल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते नियमित मिळावेत यासाठी 31 मार्चपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

हेही वाचा :

भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी?

राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी – रोहित पवार

इराणचा पाकिस्तानला मोठा धक्का; होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाला बंदी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *