खोकला सतत येत असेल तर (beloved)दुर्लक्ष करू नका, कारण तो केवळ साधा सर्दी-खोकला नसून गंभीर आजाराची सुरुवातही असू शकतो. विशेषतः क्षयरोग म्हणजेच टीबीची लक्षणे सुरुवातीला साध्या खोकल्यासारखीच दिसतात, त्यामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आजार वाढत जातो.तज्ञांच्या मते, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतत खोकला येणे हे टीबीचे मुख्य लक्षण मानले जाते.

यासोबतच ताप येणे, विशेषत (beloved)संध्याकाळी किंवा रात्री, वजन कमी होणे, भूक न लागणे आणि कधी कधी खोकताना रक्त येणे ही लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी लगेच तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे असते.टीबी हा संसर्गजन्य आजार असल्याने तो हवेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो.

त्यामुळे घरातील किंवा (beloved) आजूबाजूच्या लोकांनाही धोका निर्माण होतो. योग्य वेळी निदान आणि उपचार सुरू केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.सरकारकडूनही टीबी निर्मूलनासाठी विविध मोहिमा राबवल्या जात आहेत, आणि मोफत तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे खोकला दीर्घकाळ टिकत असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणेच सुरक्षित ठरते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *