मोठी बातमी समोर आली (decision)असून केंद्र सरकारकडून घरगुती गॅस वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. देशभरात ज्या घरांमध्ये PNG पाइप्ड नॅचरल गॅस कनेक्शन उपलब्ध आहे, त्या ग्राहकांना भविष्यात LPG गॅस सिलिंडरच्या वापरावर मर्यादा आणण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर येत आहे.

स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणे, (decision)सिलिंडर वितरणातील अडचणी कमी करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.शहरी भागात PNG कनेक्शन झपाट्याने वाढत असताना, दुहेरी सुविधा ठेवण्यापेक्षा एकाच सुरक्षित आणि सतत उपलब्ध असलेल्या गॅस पुरवठ्यावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यामुळे भविष्यात ज्या (decision) घरांमध्ये PNG कनेक्शन सुरू आहे, त्यांना LPG सिलिंडर मिळणार नाही किंवा त्यावर काही निर्बंध लागू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आणि PNG सुविधा नसलेल्या नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे. मात्र, अंतिम निर्णयाबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसून, याबाबत लवकरच सविस्तर धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.