ठाण्यात वर्गणी मागायला गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करण्यात आला. या प्रकाराने सगळेच जण हादरले आहेत.

मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्गणी मागण्याच्या वादातून हा सर्व प्रकार घडला आहे. ठाणे शहरातील गावदेवी परिसरात ही घटना घडली. गावदेवी परिसरात साई मंदिरात भजन-कीर्तन सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यासाठी वर्गणी मागायला गेलेल्या एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने डोक्यात हल्ला करण्यात आला. या प्रकाराने सगळेच जण हादरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे सभासद ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गावदेवी मार्केट परिसरात वर्गणी मागण्यासाठी गेले होते. (head) यावेळी नवनाथ वायकर नावाच्या व्यक्तीने अचानक चॉपर काढला आणि किशोर अंकुश नरे यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किशोर नरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर नवनाथ वायकर याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत. (head) दरम्यान, अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे ठाण्यात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलं आहे.
नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा मेल आला आहे. नागपूर कार्यालयाला मेल आला असून राज्यातील सर्वे पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस उडवून देण्याचा मेल आला होता. विभागीय कार्यालयातून माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलं आहे. (head) राज्यातील सर्व टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला उडवून देण्यात येणार असल्याचा मेल आला आहे. माहिती मिळाल्यानंतर तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे. विभागीय कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीने टपाल कार्यालय रिकामी करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
भोंदू अशोक खरातकडून मंदिराच्या परिसरात नरबळी?
राजकारण वंगाळ, सुनेत्राकाकींनी काळजी घ्यावी – रोहित पवार
इराणचा पाकिस्तानला मोठा धक्का; होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजाला बंदी