भोंदूबाबांच्या अंधश्रद्धेच्या (problem)आड दडलेलं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुलीच्या लग्नात अडथळे येत असल्याची समस्या सांगून एका कुटुंबाने एका भोंदूबाबाचा आधार घेतला, मात्र त्याच विश्वासाचा गैरफायदा घेत या भोंदूबाबाने भयंकर कृत्य केल्याचं उघड झालं आहे.

मुलीच्या कुंडलीत दोष असल्याचं (problem) सांगत तो उपाय करण्याच्या बहाण्याने तिला एकटीला बोलावून घेत होता. सुरुवातीला धार्मिक विधींचं कारण देत तिचा विश्वास जिंकला, पण नंतर परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
भीती आणि बदनामीच्या (problem) धाकामुळे पीडित मुलगी बराच काळ गप्प राहिली, मात्र शेवटी तिने धाडस करून संपूर्ण प्रकार कुटुंबाला सांगितला.या घटनेनंतर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूबाबांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये आणि कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवण्यापूर्वी काळजी घ्यावी.