कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर (superstition)तालुक्यातील मिरगाव च्या “शिवनीका”अध्यात्मिक संस्थेचा प्रमुख अशोक खरात अशोक खरात कडूनच झालेलं विकृत अंधश्रद्धा कांड हे पुरोगामी महाराष्ट्रातील सर्वात भीषण आणि भेसूर प्रकरण आहे. अल्पशिक्षित असलेला हा माणूस स्वतःच्या नावाच्या आधी कॅप्टन हे बिरूद लावायचा आणि त्याबद्दल सत्य काय आहे? असा सामान्य प्रश्न कोणीही उपस्थित केला नाही.

आता त्याच्या चरित्राचा (superstition)आणि चारित्र्याचा उकिरडा उपसला जातो आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एस. आय. टी. कडून खरात ने नरबळी दिला असल्याचा संशय न्यायालयात व्यक्त केला गेल्यामुळे हे अंधश्रद्धा कांड अघोरी वळणावर येऊन पोहोचले आहे. अशोक खरात याचे मिरगाव येथे आलिशान फार्म हाऊस आहे. याच ठिकाणी वाघाचे कातडे, कोल्ह्याचा कान, कस्तुरी, एक अग्निशस्त्र म्हणजे रिवाल्वर, पाच काडतुसे, अशा काही वस्तू आढळून आलेल्या आहेत. त्याच्याकडे असलेल्या एकूण काडतुसा पैकी पाच काडतुसांचा हिशोब लागत नाही.

नरबळी देण्यासाठी ही (superstition)काडतुसे वापरली आहेत की काय, वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी ती वापरली आहेत काय? कोल्ह्याचा कान, आणि कस्तुरी मृगाच्या बेंबीतील कस्तुरी त्याने कोठून आणली? या प्राण्यांची त्याने शिकार केली आहे काय? याचा आम्हाला तपास करावयाचा आहे असे एस आय टी च्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी लेखी स्वरूपात म्हटले आहे. त्यामुळे त्याच्याकडून केली जात असलेली अघोरी पूजा आणि या पूजेसाठी प्रसंगी नरबळी दिला असण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अशोक खरात याने अघोरी (superstition)विद्येच्या माध्यमातून पाच जणांचा नरबळी दिला आहे असा संशय तपास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातो आहे. पाच व्यक्तींचा नरबळी दिला गेला असेल तर नाशिक किंवा आसपासच्या जिल्ह्यात त्या व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार संबंधितांच्या नातेवाईकांनी केली असणार. आता त्याबद्दल तपास केला जाईल. नरबळी दिल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट त्याने आपल्या फार्म हाऊस परिसरातच केली असणार.

म्हणून आता तो परिसर (superstition)तहसीलदाराची मान्यता घेऊन खोदला जाईल. पोलीस तपासातून जी काही माहिती उघड होत आहे ती अतिशय भयानक आहे. हे सर्व अघोरी प्रकार आणि स्त्रियांचे लैंगिक शोषण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते आणि त्याबद्दल मिरगाव सारख्या छोट्याशा गावातील ग्रामस्थांना त्याची भनक लागू नये हे आश्चर्यकारक आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गावाला जाग आलेली दिसते. मिरगाव मधील ईशानेश्वर मंदिर,” शिवनीका”अध्यात्मिक संस्था, राजकीय नेते, मंत्री, शासनातील बडे वरिष्ठ अधिकारी, यांची वर्दळ अशोक खरात याच्या कार्यालयात अनेक वर्षांपासून सुरू होती.

त्यामुळे गावचे ग्रामस्थ(superstition) अशोक खरात विरुद्ध तोंड उघडू शकले नसतील कदाचित. आता मात्र ग्रामस्थ पुढे येऊन खरात याचे कारनामे सांगू लागले आहेत. अशोक खरात यांच्याकडून अनेक प्रकारचे विधी केले जायचे. कालसर्प पूजा, ओष्णोजल, वशीकरण विधी, असे अनेक प्रकारचे अघोरी प्रकार त्याच्याकडून केले जायचे आणि त्याची भरमसाठ फी आकारली जायची. वीस हजार रुपयांपासून अडीच लाख रुपयांपर्यंत फी तो उकळायचा. आणि हे सर्व बिन बोभाटपणे चालू होते. कार्यालयात अंधारात वळवळणारा नाग, कोल्ह्याचे तोडलेले कान, कस्तुरी गंध वाघाचे कातडे आदि वस्तूंमुळे धीर गंभीर वातावरण तयार केले जात असे.

या वातावरणामुळे समस्या (superstition)घेऊन आलेल्या स्त्रिया संमोहित होत असत. अघोरी विद्येचा डाव मांडणाऱ्या भोंदू बाबांच्या कडून नरबळी सारखा प्रकार घडू शकतो. असे नरबळी यापूर्वी अनेक भोंदू बाबांच्या कडून दिले गेलेले आहेत आणि पोलिसांनी ते शोधून काढलेले आहेत. अशोक खरात याच्याकडूनही असे प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी पाच नरबळी दिले आहेत का आणि दिले असतील तर कुणाचे दिले? ज्यांचे बळी दिले त्यांच्या संदर्भात कुठल्या ना कुठल्या तरी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार असू शकते. त्याचाही शोध आता घ्यावा लागेल.

अशोक खरात या भोंदू (superstition)बाबाला अग्नि शस्त्र परवाना कोणी दिला? तो कशासाठी दिला? त्याने अग्निशस्त्र चालवण्यासाठी काडतुसे कुणाकडून घेतली आणि किती घेतली? किती वापरली आणि शिल्लक किती आहेत? याचा संपूर्ण तपास सखोलपणे आता केला जाईल. त्यातून आणखी काही माहिती उघड होईल आणि ती धक्कादायक असेल.अशोक खरात विरुद्ध आतापर्यंत सात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्याविरुद्ध आता वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल. सध्या त्याच्याविरुद्ध जादूटोणा मंत्र तंत्र प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल आहे.

याशिवाय आरोग्यास उपाय कारक ठरू शकेल असे द्रव स्त्रियांना पाजवणे यासाठी त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. नरबळी सिद्ध झाल्यास खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. अशोक खरात याच्याकडून महिलांचे लैंगिक शोषण केले जात होते आणि त्याबद्दलच्या तक्रारी अजूनही पोलिसांपर्यंत येत आहेत. त्यामुळे हे अतिशय संवेदनशील प्रकरण असल्यामुळे त्याचा तपास तेजस्विनी सातपुते या आयपीएस अधिकारी महिलेकडे आहे. त्या आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अतिशय सखोलपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तपासातून जी माहिती बाहेर येते आहे ती धक्कादायक आहे. ज्याचा उल्लेख ही करता येऊ शकत नाही इतके किळसवाने प्रकार या अशोक खरात कडून केले जात होते. तो नावाच्या आधी कॅप्टन ही पदवी लावत होता. तो नेव्ही मर्चंट मध्ये कॅप्टन होता असे तो सांगत असे. प्रत्यक्षात मात्र नेव्ही मर्चंट मध्ये जाण्याइतके त्याच्याकडे शिक्षण नव्हते, तेवढी शैक्षणिक पात्रता नव्हती. पण तरीही तो कॅप्टन कसा असा प्रश्न कुणालाही विचारावासा वाटला नाही. अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकारी त्याचे भक्त होते.

त्यांनाही या घरात बद्दल संशय आला नाही. सिन्नर तालुक्यातील पोलीस किंवा नाशिक जिल्ह्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाला या खरात विषयी चौकशी करावी असे वाटले नाही. वेळीच त्याला रोखले असते तर अनेक स्त्रियांची इज्जत अबाधित राहिली असती.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *