Oplus_131072

कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध (lockdown)तीर्थक्षेत्र जोतिबा डोंगर येथे आज अचानक कडकडीत बंद पाळण्यात आला. मंदिर परिसरातील पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत स्थानिकांनी आणि पुजारी संघटनांनी हा निर्णय घेतला. सकाळपासूनच डोंगर परिसरात दुकानं, हॉटेल्स आणि इतर व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले, त्यामुळे वातावरणात काहीसा तणाव जाणवत होता.

या घटनेनंतर पुजाऱ्यांमध्ये (lockdown)मोठी नाराजी असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवरही भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे.

मंदिर प्रशासनाने विशेष (lockdown)नियोजन करत भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेतली आहे. त्यामुळे भाविकांनी शांततेत दर्शन घेतले, मात्र घडलेल्या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण कायम आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *