राज्याच्या राजकारणात मोठी (resigns)घडामोड समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पक्षात एकच खळबळ उडाली असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

रुपाली चाकणकर यांनी (resigns)अचानक घेतलेल्या या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही दिवसांपासून पक्षांतर्गत नाराजी आणि संघटनात्मक बदलांच्या चर्चांना उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी सांभाळली होती.
महिला सक्षमीकरण, संघटन (resigns)विस्तार आणि निवडणूक धोरणांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाच्या महिला आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.दरम्यान, पक्ष नेतृत्वाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी लवकरच नव्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. या घडामोडीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.