घरातील भांडी स्वच्छ आणि (polish)चमकदार दिसावीत म्हणून बहुतांश लोक भांडी धुण्याच्या लिक्विडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. पण हा वापर किती सुरक्षित आहे, याबाबत अनेकांना माहिती नसते.

अलीकडील काही अभ्यासांमधून (polish)असे समोर आले आहे की, भांडी धुण्याच्या लिक्विडमध्ये असलेले काही रसायनांचे अंश भांड्यांवर राहू शकतात आणि ते अन्नासोबत शरीरात जाण्याची शक्यता असते.विशेषतः जर भांडी नीट पाण्याने स्वच्छ धुतली गेली नाहीत, तर या लिक्विडमधील केमिकल्स थेट पोटात जातात. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो, तसेच दीर्घकाळात आरोग्याशी संबंधित इतर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
काही तज्ञांच्या मते, सतत(polish) अशा रसायनांच्या संपर्कात राहिल्यामुळे त्वचेवरही परिणाम दिसून येऊ शकतात.याशिवाय, अनेक स्वस्त लिक्विड उत्पादने योग्य प्रमाणात तपासलेली नसतात, त्यामुळे त्यांचा वापर अधिक धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे भांडी धुताना लिक्विडचा मर्यादित वापर करणे, भांडी भरपूर पाण्याने स्वच्छ धुणे आणि शक्य असल्यास नैसर्गिक पर्यायांचा वापर करणे अधिक सुरक्षित मानले जाते.घरगुती आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी छोट्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. भांडी स्वच्छ ठेवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची सुरक्षितताही महत्त्वाची ठरते.