दहावी आणि बारावीच्या(results) विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या निकालाच्या तारखांबाबत आता संभाव्य माहिती पुढे आली आहे. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यानंतर लगेचच दहावीचा(results) निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांचा ट्रेंड पाहता याच कालावधीत निकाल जाहीर केले गेले होते.सध्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगाने सुरू असून, शिक्षण मंडळाकडून निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी तयारी सुरू आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर(results) विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल पाहता येणार आहे.विद्यार्थ्यांनी आतापासूनच आवश्यक कागदपत्रे आणि सीट नंबर तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून निकाल लागल्यानंतर कोणतीही अडचण येऊ नये. तसेच निकालाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.