लाडकी बहीण योजेनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता लवकरच वितरणाला सुरुवात होणार आहे.

महायुती सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तटकरे यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सोशल मीडियावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती दिली. तटकरे यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू. (Ladki Bahin Yojana) या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही, त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती पूर्ण करावी, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर