जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील तीन गावांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या बारीपाडा, मोहोगाव आणि चावडी पाडा या गावांनी पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा थेट परिणाम एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर होत आहे. (backdrop) या संभाव्य संकटाची दखल घेत गावकऱ्यांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

या निर्णयामागे पद्मश्री चेतराम पवार यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. (backdrop) त्यांच्या सूचनेनुसार तीनही गावांमध्ये बैठका घेऊन सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावांमध्ये सुमारे 400 घरांमध्ये गॅस शेगड्या आहेत, मात्र आता या सर्व कुटुंबांनी गॅसऐवजी पारंपरिक इंधनाचा वापर करण्याचा निर्धार केला आहे. पुढील सहा महिन्यांत जंगलातील वाळलेले लाकूड, शेणापासून तयार करण्यात येणाऱ्या गोवऱ्या आणि पारंपरिक चुली यांचा वापर स्वयंपाकासाठी केला जाणार आहे.
विशेष म्हणजे हा निर्णय घेताना पर्यावरण आणि आरोग्य यांचाही विचार करण्यात आला आहे. (backdrop) धूरामुळे होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी धूरमुक्त चुलींचा वापर केला जाणार असून शक्य तितक्या पर्यावरणपूरक पद्धती अवलंबण्यावर भर दिला जाणार आहे. “देशहित सर्वोच्च” ही भावना डोळ्यासमोर ठेवून इंधन बचतीसाठी गावकऱ्यांनी एकजुटीने हा निर्णय घेतला आहे.या निर्णयाचा परिणाम केवळ या तीन गावांपुरता मर्यादित न राहता इतर भागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. संभाव्य जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वयंपूर्णतेचा मार्ग स्वीकारत या गावांनी दिलेला संदेश महत्त्वाचा मानला जात असून त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
हेही वाचा :
रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून
सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर