राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पेट्रोल भरण्यावर २०० रुपयांची मर्यादा घालण्यात आल्याचा दावा मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असला तरी या दाव्यामागचे वास्तव वेगळेच आहे.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम भारतातील इंधन बाजारावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी तुटवड्याच्या अफवा पसरल्या. या अफवांमुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. (petrol and diesel) अनेकांनी आपल्या वाहनांच्या टाक्या फुल करून घेतल्या, तर काहीजण कॅन आणि इतर भांड्यांमध्ये साठा करण्यासाठी धाव घेताना दिसले. यामुळे अचानक मागणी वाढली आणि काही ठिकाणी पुरवठ्यावर ताण निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, जालना आणि हिंगोलीसारख्या काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात इंधन भरण्यावर मर्यादा लागू केल्या. हिंगोलीमध्ये तर दुचाकींसाठी २०० रुपये आणि तीन-चार चाकी वाहनांसाठी २००० रुपयांची मर्यादा लागू करण्यात आली होती. मात्र ही मर्यादा कायमस्वरूपी नसून फक्त गर्दी नियंत्रणासाठी घेतलेला तात्पुरता निर्णय होता. (petrol and diesel) दरम्यान, महाराष्ट्र सरकारने या संदर्भात स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना दिलासा दिला आहे. सरकारने सांगितले की, संपूर्ण राज्यभर पेट्रोल-डिझेल खरेदीवर कोणतीही सार्वत्रिक मर्यादा घालण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून केवळ अफवांमुळेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (petrol and diesel) परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून हिंगोलीत लावण्यात आलेले निर्बंधही मागे घेण्यात आले आहेत.एकंदरीत, राज्यात इंधनाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा नसून अफवा आणि घाबरून केलेली साठेबाजी यामुळेच तात्पुरता तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

रिकाम्या पोटी वेलचीचं सेवन केल्यास कोणते आजार झटक्यात बरे होतात? घ्या जाणून

सोशल मीडियावर मोठा बदल; फेसबुक इंस्टाग्राम वापरण्यासाठी करावी लागणार KYC

स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! ‘इतक्या’ पदांची भरती जाहीर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *