बॉलिवूडमध्ये सध्या रणवीर सिंह याच्या ‘धुरंधर 2’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. (Dhurandhar) विशेष म्हणजे दुसऱ्या वीकेंडलाही चित्रपटाची कमाई प्रचंड वाढलेली दिसून आली असून, थिएटर्समध्ये अजूनही हाऊसफुल गर्दी पाहायला मिळत आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलर चित्रपटाने केवळ 11 दिवसांतच कमाईचे सर्व विक्रम मोडले आहेत. पहिल्या आठवड्यातच 674 कोटींहून अधिक गल्ला जमवल्यानंतर दुसऱ्या वीकेंडला चित्रपटाने नव्या उंची गाठली.(Dhurandhar) दुसऱ्या रविवारी चित्रपटाने तब्बल 68 कोटींहून अधिक कमाई करत एकूण कलेक्शन 846 कोटींच्या पुढे नेलं आहे, तर भारतातील ग्रॉस कलेक्शनने 1000 कोटींचा टप्पाही पार केला आहे.

या चित्रपटाने केवळ स्वतःच्याच पहिल्या भागाला मागे टाकलं नाही, तर इतर मोठ्या चित्रपटांचेही विक्रम मोडले आहेत. पुष्पा 2: द राइज या चित्रपटाच्या हिंदी कलेक्शनलाही ‘धुरंधर 2’ने मागे टाकत नवा इतिहास रचला आहे. अकराव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणूनही त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

चित्रपटाच्या यशामागे त्याची दमदार कथा, अ‍ॅक्शन आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय हे मोठे कारण मानले जात आहे. रणवीर सिंहसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर. माधवन यांसारख्या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गुप्तहेरगिरी, दहशतवाद आणि गँगवॉर यांचा थरारक संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. (Dhurandhar) सत्य घटनांवर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. सध्या तरी ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवरील विजयी प्रवास असाच सुरू राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *