कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे शेतीच्या वादातून दुहेरी खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वडील आणि मुलाचा निर्घृण खून करण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शितल मारुती कुंडले आणि त्यांचे वडील मारुती बंडू कुंडले यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला.(Kolhapur) हा हल्ला इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या वाटपावरून कुटुंबात दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे सांगितले जात असून काल सायंकाळी झालेल्या तीव्र वादानंतर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी संभाजी कुंडले हा मृतांचा नातेवाईक असून त्याने संतापाच्या भरात हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. (Kolhapur) घटनेनंतर त्याने स्वतःहून पोलिसांसमोर हजर होत शरणागती पत्करली. दरम्यान, या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विशेष म्हणजे, या वादाबाबत काही दिवसांपूर्वीच पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र योग्य वेळी ठोस कारवाई झाली असती तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा तसेच पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. (Kolhapur) फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या दुहेरी हत्येमुळे हिंगणगावसह संपूर्ण परिसर हादरून गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,