लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यभरातील महिलांमध्ये सध्या मोठी धावपळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात महिलांची मोठी गर्दी उसळली असून, ई-केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उद्या, 31 मार्च ही अंतिम मुदत असल्याने महिलांमध्ये घाईगडबड वाढली आहे.

अनेक महिलांच्या अर्जांमध्ये ई-केवायसी किंवा बँक खात्याशी संबंधित माहितीमध्ये चुका झाल्यामुळे त्यांना योजनेचा हप्ता मिळालेला नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून काही लाभार्थी महिलांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावं लागलं आहे.(Ladki Bahin Yojana) त्यामुळे आता कोणतीही चूक राहू नये यासाठी ग्रामीण भागातूनही महिला मोठ्या संख्येने जिल्हा ठिकाणी दाखल होत आहेत.
कार्यालयात वाढलेली गर्दी पाहता प्रशासनावर ताण निर्माण झाला असून, शेवटच्या दिवशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे महिलांनी वेळ न दवडता आवश्यक कागदपत्रांसह केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, अंतिम मुदत जवळ आल्याने आता मुदतवाढ मिळणार का याकडेही लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे उशीर न करता केवायसीमधील चुका त्वरित दुरुस्त करून योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,