Rohit Sharma ने आयपीएलच्या नव्या मोसमात मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली आणि पहिल्याच सामन्यात आपली क्लास पुन्हा एकदा दाखवून दिली. Mumbai Indians च्या या विजयात रोहितची भूमिका निर्णायक ठरली.

Kolkata Knight Riders विरुद्ध खेळताना रोहितने केवळ 38 चेंडूत 78 धावांची तुफानी खेळी केली. (IPL) त्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि अवघ्या 23 चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण करत आयपीएलमधील आपल्या कारकिर्दीतील सर्वात जलद फिफ्टी नोंदवली.
या खेळीदरम्यान रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये 550 षटकारांचा टप्पा गाठत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई आणि जगातील नववा फलंदाज ठरला, (IPL) ज्यामुळे त्याची आक्रमक फलंदाजी पुन्हा एकदा चर्चेत आली.केकेआरविरुद्ध त्याने 1100 धावांचा टप्पाही पार केला आणि या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. याआधी हा विक्रम David Warner च्या नावावर होता, मात्र रोहितने त्याला मागे टाकत नवा इतिहास रचला.
रोहितच्या या अर्धशतकाला विशेष महत्त्व आहे, कारण ते त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 50वे अर्धशतक ठरले. (IPL) अशी कामगिरी करणारा तो मोजक्या फलंदाजांपैकी एक ठरला आणि Virat Kohli नंतर 50 अर्धशतकांचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला.या सामन्यात आणखी एक खास बाब म्हणजे रोहितने पॉवरप्लेमध्येच अर्धशतक पूर्ण केले. आयपीएल इतिहासात त्याने प्रथमच पॉवरप्लेमध्ये 50 धावा करत आपल्या खेळात अजून एक नवा पैलू दाखवून दिला.
हेही वाचा :
उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट
मोठी बातमी! रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा,