महाराष्ट्रासह मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे.(heavy) मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा काल ठप्प झाली होती. आज सकाळी वाहतूक सुरळीत झाली असली तरी हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 तास हे अत्यंत धोकादायक असू शकतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.(heavy)समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास कडक मनाई करण्यात आली असून, समुद्र अजूनही खवळलेला असल्याचे दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरात पाहायला मिळाले.

मुंबईसह वसई- विरार परिसरात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने अनेक सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नालासोपारा व विरार परिसरात परिस्थिती गंभीर असून, ट्रस्ट व स्वयंसेवी संस्थांकडून नागरिकांना अन्नपाणी पुरवठा केला जात आहे. (heavy)गेल्या दोन दिवसांत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. धरणक्षेत्रांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बचाव पथक सज्ज असून, नागरिकांना सतत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक असेल तर शाळा व शासकीय कार्यालयांमध्ये सुट्टी जाहीर करण्याचाही विचार सुरू आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; बाळ दगावलं