रत्नागिरी जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत यादव(workers)यांनी शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आ.विक्रांत पाटील, माजी आमदार डॉ. विनय नातू , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. यादव यांच्या रूपाने कोकणात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा हादरा मानला जातोय. प्रशांत यादव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. शरद पवार यांच्यासह काँग्रेसलाही मोठा धक्का मानला जातोय. कारण, यवतमाळमधील काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.

प्रशांत यादव यांच्या सोबत स्वप्ना यादव, उबाठा गटाचे जिल्हा(workers) परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजय देसाई, दीप्ती महाडिक, मुग्धा जागुष्टे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे, पंचायत समिती माजी सदस्य ऋतुजा पवार, प्रकाश कानसे, शीतल करंबेळे आदींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांत जिल्हा परिषदेचे 3 माजी सदस्य, पंचायत समितीचे 6 माजी सदस्य, उबाठा चे 3 विधानसभा क्षेत्राध्यक्ष, 17 सरपंच, 17 माजी सरपंच, 13 उपसरपंच, 24 ग्रामपंचायत सदस्य आहेत
यवतमाळ जिल्हयातील कळंब तालुका युवक काँग्रेस सचिव अंकुश कासारकर, दिनेश वडकी, संतोष घोटेकर, हनुमान लोणकर, राजू टेकाम, उपसरपंच अरुण वाघमारे तसेच राज्य वखार महामंडळ कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष श्रीकांत गाडीवान यांच्यासह कर्मचारी महासंघाचे महासचिव शंकर जामदार, राजेश नामपल्लीवार, नितीन इद्रे, सूर्यकांत एडलवार आदी पदाधिकाऱ्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला .
ठाकरे ब्रँडला मुंबईत मोठा धक्का, भाजप अन् शशांकराव पॅनलचा ‘बेस्ट’ विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्यात विकासाचा नवा अध्याय रचला जात आहे. आज जवळपास 1600 कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, असे यावेळी रविंद्र चव्हाण म्हणाले. मित्र म्हणून भाजपाशी जोडले गेले आहात, यापुढे पक्ष सदैव पाठीशी राहील असेही चव्हाण म्हणाले. (workers)भाजपा सामान्य माणसापर्यंत पोहोचवा ही अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.

भाजपा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या साथीने तुम्हाला ताकद देण्याचे काम यापुढे नक्की केले जाईल. भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यसाठी प्रयत्न करा असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले. यावेळी प्रशांत यादव म्हणाले की, आजपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या सहकाऱ्यांना भाजपा पक्षच न्याय देऊ शकतो, हा विश्वास वाटल्याने भाजपामध्ये प्रवेश केला. कोकणात भाजपाला नंबर एकचा पक्ष बनवण्यासाठी आम्ही झटून काम करू.
हेही वाचा :
मोठी बातमी! मुख्यमंत्री यांच्यावर हल्ला…
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे करा सेवन, फॅटलॉससाठी सोपा उपाय
कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; बाळ दगावलं