सामुद्रिक शास्त्रानुसार स्त्रियांच्या एका अवयवाला स्पर्श करणे हे पुरुषांसाठी पश्चातापाची वेळ आणू शकते. सामुद्रिक शास्त्रामध्ये याचा उल्लेख केलाला आहे. आता हा अवयव कोणता जाणून घ्या…

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र (शरीराच्या अवयवांवरून व्यक्तिमत्व आणि भविष्य जाणणारे शास्त्र) हे प्राचीन भारतीय ज्ञान आहे. (Samudrik Shastra) यात शरीराच्या प्रत्येक भागाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. विशेषतः स्त्रियांच्या शरीरातील काही अवयवांना फार पवित्र आणि शक्तिशाली मानले जाते. सामुद्रिक शास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, स्त्रियांच्या एका विशिष्ट अवयवाला पुरुषांनी चुकूनही पाहणे किंवा स्पर्श करणे टाळावे. अन्यथा संबंधित पुरुषाला आर्थिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक अडचणी येऊ शकतात, असा विश्वास आहे.
सामुद्रिक शास्त्रानुसार, स्त्रीच्या नाभीला विशेष दिव्य शक्ती मानली जाते. (Samudrik Shastra) अनेक धार्मिक परंपरेत नाभीत देवी कालीची किंवा लक्ष्मीची ऊर्जा वास करते, असे सांगितले जाते. म्हणूनच पुरुषांनी (नात्यातील पतीसुद्धा) प्रेम किंवा इतर कोणत्याही प्रसंगी नाभीला हात लावू नये. असा स्पर्श केल्यास देवी रागावते आणि व्यक्तीवर दुःखांचा डोंगर कोसळतो, गरिबी येऊ शकते किंवा आयुष्यात मोठ्या समस्या निर्माण होतात, असा प्राचीन समज आहे. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो, अशी समज आहे.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीशास्त्रातही पती-पत्नीच्या नात्यातील काही परिस्थितींमध्ये पत्नी स्वतः पतीची सर्वात मोठी शत्रू बनू शकते, असे सांगितले आहे. चाणक्यांच्या मते, जेव्हा पती पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो, तेव्हा ती पत्नी पतीसाठी मोठा शत्रू ठरते. तिची नजर नेहमी पतीवर असते आणि ती ओझे बनते. जुगार, दारू किंवा इतर व्यसन असलेला पती पत्नीला आवडत नाही. (Samudrik Shastra) अशा पुरुषामुळे पैशाची उधळपट्टी होते, त्यामुळे तो पत्नीचा शत्रू बनतो. सतत खोटे बोलणारा पतीही पत्नीचा शत्रू ठरतो. एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते, ज्यामुळे नात्यात दुरावा येतो आणि नाते तुटू शकते.
चाणक्य सांगतात की, खरे बोलणारा आणि विश्वासू जोडीदार महिलांना नेहमी आवडतो. व्यसन किंवा दुसऱ्या स्त्रीकडे लक्ष देणारा पती स्वतःच नात्यातील समस्या निर्माण करतो. हे सर्व प्राचीन शास्त्र आणि नीतींमधील मान्यता आहेत, ज्या आजही अनेकजणांचे मार्गदर्शन करतात. मात्र, प्रत्येक नाते आदर, विश्वास आणि समजुतीवर टिकते.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत