डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, (decided)त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी टॅरीफ वाढवण्याची घोषणा केली आहे, यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय, बलाढ्य देश भारताच्या मदतीला धावला, अमेरिकेला दिला थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ पॉलिसीमुळे पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली, याचे पडसाद फक्त एकट्या भारतातच नाही तर चीनमध्ये देखील उमटले आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयामुळे भारतावर लावण्यात आलेला टॅरिफ 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता चीनने थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे.

भारतामधील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर अमेरिकेला इशारा देताना चांगलंच सुनावलं आहे. या ट्विटची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,(decided)बदमाश लोकांना एक इंच दिलं तर ते एक मैल आपल्या ताब्यात घ्यायला बघतात.चीनकडून करण्यात आलेल्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टच्या माध्यमातून चीनच्या भारतातील राजदूत शू फेइहोंग यांनी अमेरिकेला थेट संदेश दिल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता यू जिंग यांनी देखील एक पोस्ट केली आहे. “पाश्चिमात्य माध्यमे भारत आणि चीनमध्ये स्पर्धा सुरू आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करत आहेत, मात्र दोन्ही देशांनी मिळून विश्वास, सहकार्य आणि शांततेकडे वाटचाल करणे ही आता काळाची गरज बनली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून ही पोस्ट आली आहे.(decided) चीनने डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयावर उघड-उघड नाराजी दाखवली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी टॅरीफ वाढवण्याची घोषणा केली आहे, ट्रम्प यांच्या या निर्णयावर आता चीनकडून उघड-उघड नारीज व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा :
महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य