राज्याच्या राजकारणात गेल्या काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत.(leaves)अनेक नेते पक्षांतर करत असलेले दिसत आहेत. अशातच आता धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. एका माजी आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या मंगळवार दुपारी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा रंगणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.धाराशिव जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे उद्या दुपारी तीन वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई येथे कार्यकर्त्यासह राहुल मोटे हे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील राहुल मोटे यांचे कार्यकर्ते प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. प्रवेशासाठी मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यकर्त्यांनी केलं आहे. विधानसभेला शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. (leaves)त्यानंतर आता त्यांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे परभणीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ते येत्या 7 तारखेला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची चर्चा रंगली आहे. दुर्राणी यांच्या समर्थकांकडून 7 तारखेला काँग्रेस पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे परभणीत शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे.
माजी आमदार बाबाजानी दुर्रानी हे शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याआधी ते अजित पवारांच्या राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.(leaves)मात्र काही कारणांमुळे हा प्रवेश रखडल्यामुळे दुर्राणी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.