जुलै महिना संपत आला तर अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हफ्ता जमा झाला नसल्याचे लाभार्थी महिला वर्गात नाराजी पसरली आहे.(installment)तर दोन दिवसांवर रक्षाबंधन सण असल्याने लाडक्या बहिणींना जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार असल्याचे दोन दिवसांपूर्वीच सरकारकडून सांगण्यात आले होते. यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन अर्थात ९ जुलैच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, (installment)अशी मोठी अपडेट महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पात्र आणि लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय.

तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याच्या वितरणाला कालपासून सुरूवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होताना दिसणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.(installment) ते कोल्हापूर येथे बोलत होत्या.
हेही वाचा :
महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य