यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत आणि इच्छाशक्ती हे (jobs)दोनच मार्ग आहेत. कधीही कोणतेही अपयश आले तरीही हार मानायची नाही, असं सांगितलं जातं. त्यामुळे नेहमी प्रयत्न सुरु ठेवायचे. असंच काहीस प्रतीक जैन यांनी केलं. त्यांनी आपल्या मेहनतीच्या आणि शिक्षणाच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली. ते आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी खूप कमी वयात यश मिळवले.

प्रति जैन यांचा जन्म २५ जुलै १९९३ रोजी राजस्थानमधील (jobs)अजमेर येथे झाला. ते २०१८च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रतिक यांनी BITS Pilani येथून मेकॅनिकल इंजिनियरिंग आणि बायोलॉजिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर २०२० मध्ये JNU येथून पब्लिक मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली.
प्रतिक जैन यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली. त्यांनी प्रिलियम्स आणि मेन्स परीक्षा पास केली परंतु त्यांना फायनल लिस्टमध्ये जागा मिळाली नाही. त्यांची निवड इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये झाली.
प्रतीक यांचे लक्ष्य आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ८६ रँक प्राप्त केली.ते २५व्या वर्षी आयएएस अधिकारी बनले.
प्रतिक जैन यांनी अनेक ठिकाणी काम केले आहे. ते डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत हरिद्वार येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी हरिद्वारचे सीडीओ म्हणून काम पाहिले. यानंतर ते नैनिताल येथे उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम म्हणून काम केले.
हेही वाचा :
राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार….
रशियाचे 10,000 रुबल भारतात किती रुपयांचे ?
इंधनाविना 31 हजार 237 फूट उड्डाणकरण्याचा सौरविमानाचा जागतिक विक्रम