सरकारी बँकेत नोकरी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते.(Bank) यासाठी बँकेच्या परीक्षा द्यावा लागतात. परंतु तुम्हाला आता कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरी मिळणार आहे. स्टेट बँकेत भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करायचा आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्हाला sbi.bank.in वेबसाइटवर सर्व माहिती मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे.

स्टेट बँकेत आयटी सिक्युरिटी एक्सपोर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजी(Bank), सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट, इंसिंडेंट मॅनेजमेंट आणि फॉरेन्सिक आणि टेस्ट इंजिनियर्स कॅडरमध्ये डेप्युटी मॅनेजरपदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.स्टेट बँकेत एकूण १२ पदांसाठी भरती होणार आहे. विविध विभागात ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक/ बी.ई / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.एमसीए किंवा एमटेक / कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी / कॉमप्युटर सायन्स आणि इंजिनियरिंग / सॉफ्टवेअर इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ४ वर्षांचा अनुभव असायला हवा.

या नोकरीसाठी २५ ते ३५ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. (Bank)या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ६४८२०-९३९६० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! भाविकांवर काळाचा घाला, श्रीरामपूर -संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात, कार, ट्रकच्या धडकेत 6 जणांचा मृत्यू

शाहिद कपूरच्या करियरमधील असा चित्रपट, जिथे हिरॉईनपेक्षाही मिळाले होते कमी पैसे!

भारतात मान्सूनचे वेळापत्रक आणि दिशा का बदलत आहे? 6,800 KM अंतरावर सापडले कारण; शास्त्रज्ञांची झोप उडाली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *