कृष्णा नदीची पाणी(water) पातळी 42 फुटांवर पोहचली

चांदोली पाठोपाठ कोयना धरणातून विसर्ग कमी केल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढण्याचा वेग कमी झाला
धोका पातळी असलेल्या 45 फुटाच्या वर(water) पाणी पातळी जाऊ न देण्याचा सांगली पाटबंधारे विभागाकडून प्रयत्न
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवरून ११ फुटापर्यंत खाली आणले
चांदोली धरणातील विसर्ग कमी करून 15369 क्युसेक इतका विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सोडण्यात येतोय
जिंतूर नांदेड महामार्गावर खड्डेच खड्डे
नांदेड महामार्गावरील भेंडेगाव रेल्वे फाटक परिसरात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने परिस्थिती आणखी धोकादायक बनली आहे.रस्त्यावरील खड्डे आणि पाण्यामुळे दुचाकीस्वार व लहान वाहन चालकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अपघात होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.
उजनी व वीर धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती
उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चंद्रभागा पात्रा नजीक असणाऱ्या अंबिका नगर आणि व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी घुसल्याने शंभर कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कालपासून उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येऊ लागल्याने शहरातील नदीकाठच्या भागात रात्री उशिरा पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने रात्रीतून जवळपास शंभर कुटुंबांचे स्थलांतर सुरक्षित स्थळी केलेली आहे.
पावसामुळे जमिनीला पाझर, सोयाबीन शेती शेवाळली
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अजूनही शेतीतून पाणी ओसरले नाही. अक्षरशः शेतीला पाझर फुटला आहे. शेतजमीन शेवाळली आहे. सोयाबीनसह उडीद, मूग आणि कांदा पिकाला फटका बसला आहे.
हेही वाचा :
खास लोकांच्या स्वागतासाठी फक्त ‘रेड कार्पेट’च का?
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यासाठी सज्ज
स्त्री रुपातील गणेश मूर्ती असलेले महाराष्ट्रातील रहस्यमयी मंदिरEdit