सरकारी कंपनीत नोकरी करण्याचा विचार करत असाल तर ही (Salary)बातमी खास तुमच्यासाठी आहे. सरकारी कंपनी GAIL Limited मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही.भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी गेल इंडियाने भरतीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या भरती मोहिमेत रसायन, उपकरण, विद्युत आणि यांत्रिक या शाखांमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती केली जाणार आहे.

उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.(Salary) निवड प्रक्रिया मुलाखत आणि गटचर्चेद्वारे होणार आहे. एकूण ७० जागांसाठी ही भरती विविध विभागांमध्ये करण्यात येणार आहे.पात्रतेनुसार कार्यकारी प्रशिक्षणार्थी रसायन पदासाठी रसायन, पेट्रोकेमिकल, रसायन तंत्रज्ञान किंवा पॉलिमर विज्ञान या विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. कार्यकारी प्रशिक्षणार्थी उपकरण पदासाठी उपकरण अभियांत्रिकी, उपकरण आणि नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरण, विद्युत आणि उपकरण किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.

कार्यकारी प्रशिक्षणार्थी विद्युत पदासाठी विद्युत, विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स किंवा (Salary)विद्युत आणि ऊर्जा या विषयातील अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २६ वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजार रुपये ते १ लाख ८० हजार रुपये दरमहा वेतन मिळणार आहे. त्यामुळे चांगल्या आणि प्रतिष्ठित कंपनीत करिअर घडवण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.

हेही वाचा :

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले ‘हे’ विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

शेतकरी मित्रांनो सावधान! ‘या’ अटी पूर्ण नसतील तर २२ वा हप्ता अडकणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *