गुजरामतमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेतल्यात एका कनिष्ठ विद्यार्थ्याने त्याची हत्या केली. अहमदाबादमध्ये ही घटना घडली असून यानंतर मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. पोलीस तपासात आरोपी आणि त्याच्या मित्रामधील संभाषण(conversation) उघड झाले आहे, ज्यामध्ये मुलाने आपला गुन्हा कबूल केला आहे.

मित्र – भाई, तू आज काही केलंस का
हो
मित्र – तू कोणाला चाकूने भोसकलंस का?
तुला कोणी सांगितलं?
मित्र – मला फोन कर, आपण फोनवर बोलूयात
नाही नाही
मित्र – चॅटवर हे सर्व नको. माझ्या डोक्यात सर्वात आधी तुझं नाव आलं म्हणून तुला फोन केला.
आरोपी – सध्या मोठा भाऊ सोबत आहे. त्याल माहिती नाही. तुला कोणी सांगितलं?
मित्र – तो बहुतेक मेला आहे.
आरोपी – काय? कोण होता तो?
मित्र – अरे तूच चाकू मारला होतास ना? ते विचारतोय.
आरोपी – हा मग…
आरोपीने मंगळवारी त्याचा सिनिअर नयन संतानीवर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. गंभीर जखमी झाल्याने पीडित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या एका मेसेजमध्ये आरोपीने लिहिले, “तो बोलदे की * ने मारा .
जेव्हा मित्राने चाकूने हल्ला करण्याचे कारण विचारले तेव्हा त्याने नयनवर त्याला धमकी देण्याचा आणि “मला बोलत होता तू कोण आहेस? तू काय करणार आहेसअसा दावा केला. त्यावर त्याच्या मित्राने अशा गोष्टीवरून कोणावर चाकूने हल्ला करु शकत नाही. तू त्याला मारू शकला असतास. तू त्याला मारुन टाकायला नको होतं असंही मित्र म्हणाला. पण आरोपीलाही कोणताही पश्चाताप वाटत नाही. सोड ना, होऊ दे. जे झालं ते झालं असं तो म्हणतो(conversation).
मंगळवारी दुपारी नयन घरी जाण्यासाठी निघाला होता. तो सेव्हन्थ-डे अॅडव्हेंटिस्ट हायर सेकेंडरी स्कूलच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर, तेव्हा आठवीच्या एका ज्युनियर आणि इतर काही मुलांनी त्याला घेरलं. शाब्दिक वादाचे नंतर हाणामारीत रूपांतर झाले. आठवीच्या एका मुलाने चाकू काढला, वार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये, नयन पोटावर हात ठेवून रक्त रोखण्याचा प्रयत्न करत शाळेत प्रवेश करताना दिसत आहे. त्याला मणिनगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी शाळेच्या इमारतीच्या मागील बाजूस पळून गेला. तथापि, सुरक्षा रक्षकाने त्याला पाहिलं, ज्याने नंतर शाळा प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली.
अहमदाबादच्या खोखरा येथील शाळेच्या आवाराबाहेर ही घटना घडली. प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे आणि अल्पवयीन आरोपीला बालगुन्हेगार कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. नयन संतानी, इयत्ता 10 वीचा विद्यार्थी, याची इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्याने चाकूने भोसकून हत्या केली. ही घटना शाळेच्या बाहेर झाली आणि नयनला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.
प्रारंभिक तपासात असे दिसून आले की, दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाला होता, ज्यामुळे ही हिंसक घटना घडली. इन्स्टाग्राम चॅटमधून असे समोर आले की, आरोपीने आपल्या मित्रासमोर आपला गुन्हा कबूल केला होता.
पोलिसांनी इयत्ता 8 वीच्या आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने तपास सुरू केला असून, डीव्हीआर जप्त केले आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर ठरणार टर्निंग पॉईंट? अंजली दमानियांचं शिंदेंबाबतचं वादग्रस्त भाकीत
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर…..
मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव….