मुंबईहून बारामतीकडे येत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ (airport) भीषण अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकही व्यक्ती वाचू शकली नाही. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. अपघातानंतर काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, विमान आकाशातच एका बाजूला झुकून कोसळल्याचे स्पष्ट दिसत असल्याने या दुर्घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. शोक व्यक्त होण्याआधीच शपथविधी झाल्याने अनेकांनी या निर्णयावर टीका केली असून, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत शरद पवार यांनी पत्रकार परिषद (airport) घेत आपल्याला याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट केले. सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत, याचीही माहिती आपल्याला नव्हती, असे त्यांनी सांगितले. याचवेळी शरद पवार यांनी एक महत्त्वाचा राजकीय खुलासा करत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले आणि याची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला होणार होती, असा दावा केला. मात्र अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडींमुळे या प्रक्रियेला खंड पडल्याचे त्यांनी सूचित केले.

या पार्श्वभूमीवर (airport) जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती, असे सांगितले जात असताना अजित पवार गटातील नेत्यांनी मात्र या दाव्यांना साफ नकार दिला. अशा चर्चा झाल्या असत्या तर अजित पवार यांनी आमच्याशी नक्कीच बोलले असते, असे काही नेत्यांनी स्पष्टपणे म्हटले. दरम्यान, या वादात आता आणखी एक मोठा दावा समोर आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिला होता, असे एका राज्यातील वरिष्ठ नेत्याने जाहीरपणे सांगितले आहे. याच दाव्याला पुढे नेत शरद पवार गटातील एका नेत्याने सांगितले की, संभाव्य तोडग्यानुसार सुप्रिया सुळे यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी, अजित पवार यांना राज्यात नेतृत्व आणि अमोल कोल्हे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा फॉर्म्युला ठरला होता. या दाव्यांमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले असून, अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या घटनाक्रमाने अनेक अनुत्तरित प्रश्न मागे ठेवले आहेत.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *