अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.(events)अजित दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या नावांची चर्चा होत आहे. खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असा दावा केला जात होता, मात्र आता पटेल यांनी हे वृत्त झालेले आहेत, असा दावा केला जात होता. परंतु नंतर त्यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (events)आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत पटेल यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती त्यांना दिली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. आज एनडीए संसदीय दलाच्या बैठकीनंतर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार (events)असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शहा यांनी या लोकांना यात राजकारण दिसत आहे असं विधान प्रफुल्ल पटेल यांच्या समोर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अमित शहा आणि भाजप यांचा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला विरोध तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अजित पवार यांचे विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिल्लीला घेऊन या असं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पटेल यांना दिल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर बोलताना म्हटले की, (events)विलीनीकरणाबाबत अजितदादांची माझ्याशी काही चर्चा झाली नाही. विलीनीकरणाबाबत आम्हाला माहीत नाही असं होऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगेळी भूमिका घेतली होती. स्थानिक स्वराज्यमध्ये दादांनी सांगितलं आपण सर्व वेगवेगळे लढत आहोत. आपली मते विभागली तर फरक पडू शकतो. त्यामुळे शरद पवार गटाशी बोलून समन्वय घडवू असं अजितदादा म्हणाले होते. एवढीच चर्चा झाली, असे सांगत प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग