राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.(helicopter)उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचे लक्षात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे उड्डाणापूर्वीच पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.पंकजा मुंडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. निवडणूक प्रचारासाठी पंकजा मुंडे आज लातूर दौऱ्यावर आहेत. लातूर दौऱ्यासाठी त्या संभाजीनगरवरून निघाल्या होत्या. पण अचानक त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड वेळीत लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नेमका तांत्रिक बिघाड काय झाला हे अद्याप समजू शकले नाही. पंकजा मुंडे दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार आहेत. तांत्रिक बिघाड झालेल्या हेलिकॉक्टरची तपासणी केली जात आहे.

हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचा लातूर दौरा रखडला. (helicopter)हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचा प्रवास लांबला. या घटनेमुळे लातूरमधील पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील सभांच्या वेळा पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या हेलिकॉप्टरने पंकजा सभांना हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरे हेलिकॉप्टर आल्यानंतर त्या निर्धारित प्रवासाला निघणार आहेत. मुंबईवरून दुसरे हेलिकॉप्टर थोड्याच वेळात येईल आणि त्यानंतर त्या लातूरकडे निघतील असं सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये झालेल्या (helicopter)प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले होते की, मी हेलिकॉप्टरने फिरते म्हणून माझी आई देव पाण्यात ठेवते.’ आणि आज सकाळी त्यांचे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. पण सुदैवाने उड्डाण घेण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमधील बिघाड पायलटच्या लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *