राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असताना राजकीय(Political) घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने तयारी सुरू केली असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

दमानिया यांनी स्पष्ट केलं की सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय (Political)हालचाली होणार असून त्याचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर दिसून येईल. “एकनाथ शिंदे यांचा सप्टेंबरपर्यंत भाव वाढलेला दिसतोय,” असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे.
दरम्यान, केंद्रात उपराष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या हालचालींवरही त्यांनी भाष्य केलं. एनडीएतील काही घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे, त्यामुळे राज्यात समन्वय साधण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली असावी, असं दमानिया म्हणाल्या.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने युती केली होती, मात्र निकालात त्यांचा धुव्वा उडाला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना दमानिया म्हणाल्या, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांचं भविष्य नाही.
ते स्वतःचा भाव वाढवण्यासाठी भाजपकडे झुकतील आणि एक दिवस उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील.”एकूणच, सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होऊ शकतो, असं दमानियांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा :
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांसाठी खुशखबर…..
मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव….
महापालिका निवडणुकांसंदर्भात आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी