ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक केल्यानंतर घातपाताचा संशय दिसला,(house) तर दादांची शप्पथ घेऊन सांगतोय, त्याच्या घरात त्याची चिता जाळायला कुणीचं शिल्लक राहणार नाही, ही धमकी किंवा इशारा समजा, असे आमदार अमोल मिटकरी स्पष्टच बोलले. साम टीव्हीसोबत बोलताना मिटकरी यांनी अजित पवार यांच्याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘अजित दादांची लाडकी बहीण योजना’ असं नाव या लाडकी बहीण योजनेला देण्यात यावं, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर अनेकदा शंका उपस्थित केली आहे. (house)अजितदादा हे महाराष्ट्रातील लोखो लोकांचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्या मृत्यूची बातमी महाराष्ट्र पचवू शकला नाही. अजितदादांच्या हातातील हातातील घड्याळ गायब असल्याचा संशय कालच उपस्थित केला होता. आज तुमच्या चॅनलने बातमी दाखवली की दादांची ओळख हातातील कपड्यामुळे झाली. यात जर घातपाताचा संशय दिसला, तर त्याच्या घरात चिता जाळायाला कुणी शिल्लक राहणार नाही, असा इशारा मिटकरींनी दिला.

विमान अपघाताच्या घटनेआधीच्या दोन ते तीन दिवसापूर्वीची अजित दादांची(house) भाषणे बघितली. ते म्हणत होते माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही, आम्ही तुम्ही परमनंट जन्माला आलेलो नाही.. त्यांना चाहूल लागली होती कां?,.. शपथ घेऊन सांगतोय अपघातामागे काळबेरं असलं तर आम्ही पण पुढच्या परिणामाची चिंता करणार नाही, असे मिटकरी म्हणाले.

दादांचं ओळख पटल्याचं कारण म्हणजे दादांच्या पायला फंगल इन्फेक्शन होतंये,(house) त्यामुळं सुरुवातीला दादांची ओळख पटली. दादांचा शंकर नावाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, तो दररोज दादांच्या पायाला तेल लावून द्यायचा. पायावरील फंगल इन्फेक्शन मुळेचं दादांची ओळख पटली, असा दावा मिटकरींनी केला. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित दादांचे स्मृति जपण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित दादांचं नाव द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *