लोणावळ्यात मुसळधार पावसातही चोरट्यांनी धाडसी चोरी(Theft) केली आहे. भांगरवाडी परिसरातील दोन वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये चोरी करून तब्बल ५ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा रोख आणि सोन्याचा ऐवज चोरून नेला गेला.

पहिली घटना योगेश कोठावदे यांच्या फ्लॅटमध्ये घडली. कुटुंब कल्याणला गेले असल्याने चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाज्याची कडी तोडून प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. दुसरी चोरी(Theft) गोखले पार्क परिसरातील भरत मेंगडे यांच्या घरात झाली, जिथून रोख रक्कम आणि चांदीच्या पट्ट्या चोरल्या गेल्या.
याच बरोबर, नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगर परिसरातही भरदिवसा चोरी घडली. डॉ. शाम शेंडे यांच्या घरातून लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन चोरले गेले. चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.पोलिसांनी तीनही प्रकरणी तक्रार नोंदवली असून तपास सुरु आहे.
हेही वाचा :
महापालिका निवडणुकांसंदर्भात आत्तापर्यंतची सर्वात मोठी बातमी
रवीना टंडनचा पहिला हिरो आहे 2900 कोटींचा मालक, आजही अविवाहित..
लोकप्रिय अभिनेत्री ‘गोपी बहू’ने केले लग्न,