इंटरनेट बँकींग किंवा मोबाईल बँकींगद्वारे पैसे ट्रान्सफर(transfer) करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. देशातील प्रमुख बँका SBI, HDFC, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांनी इमिजिएट पेमेंट सर्व्हिस ट्रान्सफरवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी बहुतांश बँका ही सुविधा मोफत पुरवत होत्या, मात्र आता ग्राहकांना ठराविक मर्यादेनुसार फी द्यावी लागणार आहे. नवीन नियम १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहेत.

SBI चे नवीन चार्ज

₹२५,००० पर्यंत – कोणताही चार्ज नाही

₹२५,००० ते ₹१ लाख – ₹२ + GST

₹१ लाख ते ₹२ लाख – ₹६ + GST

₹२ लाख ते ₹५ लाख – ₹१० + GST

कॅनरा बँकेसाठी नवीन चार्ज

₹१,००० पर्यंत – फ्री

₹१,००० – ₹१०,००० : ₹३ + GST

₹१०,००० – ₹२५,००० : ₹५ + GST

₹२५,००० – ₹१,००,००० : ₹८ + GST

₹१,००,००० – ₹२,००,००० : ₹१५ + GST

₹२,००,००० – ₹५,००,००० : ₹२० + GST

पंजाब नॅशनल बँकेसाठी चार्ज

₹१,००० पर्यंत – फ्री

₹१,००१ – ₹१,००,००० : ब्रँच – ₹६ + GST, ऑनलाईन – ₹५ + GST

₹१,००,००० पेक्षा जास्त : ब्रँच – ₹१२ + GST, ऑनलाईन – ₹१० + GST

HDFC बँकेचे नवीन चार्ज

₹१,००० पर्यंत : सर्वसाधारण ग्राहक – ₹२.५०, वरिष्ठ नागरिक – ₹२.२५

₹१,००० – ₹१,००,००० : सर्वसाधारण ग्राहक – ₹५, वरिष्ठ नागरिक – ₹४.५०

₹१,००,००० पेक्षा जास्त : सर्वसाधारण ग्राहक – ₹१५, वरिष्ठ नागरिक – ₹१३.५०

Gold आणि Platinum अकाउंट धारकांना चार्ज द्यावा लागणार नाही

काय आहे IMPS?

IMPS म्हणजे Immediate Payment Service. ही एक रिअल-टाईम पेमेंट सेवा असून ती २४x७ उपलब्ध आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही सेवा ऑपरेट करते. ग्राहकांना कोणत्याही वेळी पैसे पाठवणे(transfer) किंवा मिळवणे शक्य होते. बँकांच्या या निर्णयामुळे आता डिजिटल ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा :

जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन

मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग

MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण… 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *