वाहनमालकांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.(vehicle)आता 15 वर्षे पूर्ण झालेल्या गाड्यांची नोंदणी नूतनीकरण करून त्या गाड्या आणखी 5 वर्षे म्हणजे 20 वर्षांपर्यंत वापरण्याची परवानगी मिळणार आहे. म्हणजेच, वाहनधारकांना आपल्या जुन्या गाड्या रस्त्यावर चालविण्यासाठी अतिरिक्त मुभा मिळाली आहे. मात्र, या निर्णयाबरोबरच नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले आहे.हा नियम “सेंट्रल मोटर व्हेईकल्स रूल्स तिसरी दुरुस्ती, 2025” अंतर्गत लागू करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट 2025 पासून तो देशभर अमलात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या बदलामागील उद्देश प्रदूषण करणाऱ्या जुन्या गाड्या हळूहळू रस्त्यावरून हटवणे आणि लोकांना नवी वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

नवीन शुल्क संरचना :
नवीन तरतुदीनुसार 15 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांचे नोंदणी नूतनीकरण (vehicle)करण्यासाठी खालील शुल्क आकारले जाणार आहे :
चालकाने चालवली जाणारी गाडी : ₹100
दुचाकी वाहन मोटरसायकल : ₹2,000
थ्री-व्हीलर किंवा क्वाड्रिसायकल : ₹5,000
हलके मोटार वाहन : ₹10,000
आयात केलेली दुचाकी : ₹20,000
आयात केलेली चारचाकी : ₹80,000
इतर श्रेणीतील वाहने : ₹12,000

यातील सर्व शुल्के जीएसटीपासून स्वतंत्र असतील.
सरकारच्या या निर्णयामुळे वाहनमालकांना जुन्या गाड्या आणखी 5 वर्षे वापरण्याचा फायदा मिळेल. मात्र, नूतनीकरणाचं शुल्क वाढल्याने त्यांना मोठा आर्थिक बोजा बसणार आहे.(vehicle) उदाहरणार्थ, कार मालकांना 10 हजार रुपये तर आयात केलेल्या चारचाकीसाठी तब्बल 80 हजार रुपये द्यावे लागतील सरकारच्या मते, या बदलामुळे प्रदूषण नियंत्रणास मदत होईल आणि बाजारात नवीन वाहनांची मागणी वाढेल. परंतु वाहनमालकांच्या खिशावर मात्र या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.

हेही वाचा :

जुन्या वाहनधारकांसाठी मोठी खुशखबर! 20 वर्षांपर्यंत वाढणार रजिस्ट्रेशन

मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग

MLA बापाची हिरोइन मुलगी, दोन भावांच्या दुश्मनीचे बनली कारण… 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *