भारतीय चित्रपटसृष्टीत मेगा फॅमिलीचा बोलबाला मोठा आहे. या घराण्यातील दोन सुपरस्टार(superstar) अल्लू अर्जुन आणि राम चरण यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. पण या दोन भावांमध्ये जवळपास १८ वर्षांचा दुरावा निर्माण झाला असल्याच्या चर्चा चित्रपटसृष्टीत सतत रंगल्या.

या दुराव्याचं कारण अभिनेत्री नेहा शर्मा असल्याचं अनेकदा म्हटलं गेलं. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चिरुथा चित्रपटातून नेहा शर्माने राम चरणसोबत अभिनय केला होता. त्यावेळी अल्लू अर्जुन आणि नेहा यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा होत्या. मात्र, चिरुथाच्या शूटिंगदरम्यान नेहा आणि राम चरण एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांचं गुपचुप लग्न झाल्याच्याही अफवा पसरल्या.

या चर्चांमुळे अल्लू अर्जुन खूप दुखावला गेला आणि त्यातूनच दोघांच्या नात्यात कटुता आली, असे म्हटले जाते. तथापि, राम चरणने टेलिव्हिजन शोमध्ये नेहा शर्मासोबतच्या लग्नाच्या बातम्या फेटाळल्या आणि त्या पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. त्याने सांगितलं की, अशा अफवांमुळे त्याची पत्नी उपासनासोबत गैरसमज होऊ शकतो.

दरम्यान, राम चरणने २०१२ मध्ये उपासनाशी लग्न केलं तर अल्लू अर्जुनने(superstar) २०११ मध्ये स्नेहा रेड्डीशी विवाह केला. दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी असून व्यावसायिक क्षेत्रातही चमकत आहेत.

तरीदेखील, अनेक कार्यक्रमांमध्ये हे दोघे क्वचितच एकत्र दिसतात, त्यामुळे चाहत्यांमध्ये अजूनही या नात्यातील दुराव्याची चर्चा सुरु असते. या दुराव्याचं खरं कारण मात्र आजवर उघड झालेलं नाही.

हेही वाचा :

मोठी बातमी, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीचा सांगितला टायमिंग

हार विकणारी मोनालिसा आता 30 दिवसांत कमावते बक्कळ पैसा, जाणून उंचावतील भुवया

बाबा वेंगाची ती भविष्यवाणी खरी ठरतेय! या देशात भूकंप आणि त्सुनामीचा कहर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *